पन्नास वर्षांपूर्वी…

आजच्या लोकसत्ता मधील लेख..

आज मध्यरात्री होणार महाराष्ट्र राज्याची स्थापना..!
संकलन : शेखर जोशी,लोकसत्ता

..अखेर १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. ज्या मुंबईसह महाराष्ट्रासाठी हा लढा दिला त्या मुंबईत आज मराठी भाषा व मराठी माणसाची अवस्था दयनीय झाली आहे. मुंबईतील मराठी भाषकांचा टक्का कमी होत चालला आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने साहित्य, कला, चित्रपट, व्यापार, शिक्षण, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक, उद्योग आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेणारी ही विशेष वृत्तमालिका..
मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याच्या मागणीस केंद्रातील कॉंग्रेस नेत्यांनी अखेर मान्यता दिली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.  मुंबईतील ‘नवाकाळ’ दैनिकाने ३० एप्रिलच्या अंकात ‘आज मध्यरात्री महाराष्ट्र राज्याची स्थापना होणार’ अशी आठ कॉलमी हेडलाईन केलेली होती. भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उद्घाटन, राजभवनात खास समारंभ अशी पोटशीर्षकेही या मुख्य बातमीला देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सोहळा कधी, कुठे आणि कशाप्रकारे साजरा करण्यात येणार आहे, त्याची सविस्तर माहिती यात देण्यात आली होती.
राजभवनातील एका खास समारंभात एप्रिल ३०, मे १ च्या मध्यरात्री बरोब्बर बारा वाजता भारताचे पंतप्रधान पं. नेहरु हे वीजेचे बटण दाबून महाराष्ट्राच्या नकाशाचे दर्शन घडवतील आणि महाराष्ट्राचे नवीन राज्य स्थापन झाल्याचे जाहीर करतील. हा नकाशा निऑलाईनमध्ये बनवला आहे. त्याचबरोबर प्रत्येकी सहा फूट व्यासाचे कित्येक प्रचंड नगारे वाजविण्यात येतील. त्यांना घंटानाद व शहनाईचे सूर यांची साथ राहील. संपूर्ण शहरातील चर्चेस्, मंदिरे यातही शेकडो घंटा वाजविण्यात येतील. शहरातील गिरण्या व कारखाने यांचे भोंगे वाजतील. रेल्वे इंजिने आणि जहाजे शिट्टय़ा वाजवतील, असे या बातमीत म्हटले होते. रामलाल यांच्या शहनाई वादनाने राज्याचा उद्घाटन समारंभास रात्री साडेअकराला प्रारंभ होईल. लता मंगेशकर ज्ञानेश्वरांच्या पयादानातील ओव्या गाऊन दाखवतील, असेही या बातमीत पुढे म्हटले आहे.
याच अंकात ‘नव्या महाराष्ट्राची हाक एकजुटीची’ या शीर्षकाचा अग्रलेख आहे. तर १ एप्रिल १९६० च्या अंकात ‘मुंबई द्विभाषिक विभाजन बिलावर लोकसभेत चर्चा’ अशी बातमी आहे. ‘डांगे व गोरे यांच्यात शाब्दीक झटापट, लो. अणे यांचा विरोध’अशी उपशीर्षकेही या बातमीस आहेत. मुंबई द्विभाषिकाचे विभाजन करुन महाराष्ट्र आणि गुजराथ अशी दोन एकभाषिक राज्ये स्थापन करणारे बिल आज लोकसभेत मांडून गृहमंत्री पं. पंत यांनी हे बिल लोकसभेच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याची सूचना केली. समितीने १४ एप्रिल १९६० रोजी आपला अहवाल सादर करायचा आहे, असेही या बातमीत म्हटले आहे.

भारी वाटलं वाचताना… इतिहासामधून चालत असल्या सारखं…
त्या हुतात्म्यांना पुनश्च अभिवादन करून मराठी अभिमान गीत ऐकलं..
शहारे आले एकदम🙂

सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिन अभिष्टचिंतन!!!

मराठी अभिमान गीत

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

बोलतो मराठी
ऐकतो मराठी
जाणतो मराठी
मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या फुलाफुलात नांदते मराठी
येथल्या कुलाकुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडतेमराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरु-लतात सादते मराठी
येथल्या कळीकळीतलाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पीकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

बोलतो मराठी
ऐकतो मराठी
जाणतो मराठी
मानतो मराठी

दंगते मराठी
रंगते मराठी
स्पंदते मराठी
वर्षते मराठी

धुंदतेमराठी
गर्जते मराठी
गर्जते मराठी
गर्जते मराठी

जय महाराष्ट्र!

Published by

3 thoughts on “पन्नास वर्षांपूर्वी…”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s